छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण

 *बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या राजनैतिक विचारांचे प्रतिबिंब आहे. एकूणच शिवकालीन राजनीतीचा अनमोल ठेवा म्हणजे हा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण तीन अध्याय आणि सुमारे साडेआठशे श्लोक आहेत. पहिला अध्याय उपोद्घात आहे. दुसरा अध्याय आहे राजनीति आणि तिसरा अध्याय आहे प्रकीर्णनीति,या ग्रंथातील काही श्लोक संभाजी महाराजांनी स्वतः रचलेले आहेत तर काही श्लोक त्यांनी अन्य संस्कृत ग्रंथांमधून संकलीत केलेले आहेत. यांत महाभारत, रामायण कामंदकीय नीतिसार, याज्ञवल्क्यस्मृति, चाणक्यनीति, मनुस्मृति इत्यादी ग्रंथातील अनेक श्लोक जसेच्या तसे घेतले आहेत.*


*संभाजी महाराजांनी हा ग्रंथ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिला आहे. संभाजी महाराजांची प्रतिभा आणि विद्वता या दोन्ही गुणांची ओळख हा ग्रंथ वाचताना प्रत्येक पानावर होते.*


*या ग्रंथाचा विषयच मुळात राजनीति म्हणजे राजकारण हा आहे. इतक्या लहान वयात देखील संभाजी महाराजांची राजनैतिक दृष्टी किती व्यापक आणि प्रगल्भ होती हे सुद्धा या ग्रंथाच्या अध्ययनाने आपल्या ध्यानात येते. राजकारण हा शब्द आज आपण ज्या अर्थाने वापरतो तो संभाजी महाराजांना अभिप्रेत नाही. राष्ट्राच्या धर्माच्या आणि स्वजनांच्या हिताचे राजकारण त्यांना अभिप्रेत आहे. त्यामुळेच आजच्या काळात देखील राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने हा ग्रंथ अवश्य अभ्यासला पाहिजे असे मला वाटते. शालेय अभ्यासक्रमांत या ग्रंथातील निवडक श्लोकांचा समावेश झाला तर हे विद्यार्थ्यांना जिवनात जगताना खुप उपयोगी पडेल असे मला वाटते.*


*या ग्रंथातील तत्वांचा प्रभाव ज्याच्यावर असेल तो व्यसन, व्यभिचार भ्रष्टाचार, अनैतिकता, स्वार्थ, निष्काळजीपणा, दुराचार इत्यादी दुर्गुणांपासून निश्चितच स्वतःला दूर ठेवेल. या ग्रंथातील विचार आत्मसात केल्यास शौर्य, धैर्य, साहस, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती, पौरुष, पराक्रम, परोपकार आणि ईश्वरभक्ती हे सद्गुण वाचकांच्या ठायी नक्की निर्माण होतील असा मला विश्वास वाटतो. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ एक प्रभावी साधन आहे. संभाजी महाराजांच्या विचारांचे,विद्वत्तेचे आणि प्रतिभेचे प्रभावी प्रकटीकरण या ग्रंथात झाले आहे.*

*__श्री बुधभूषण_*

https://wa.me/917498946774





*जय जिजाऊ🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे🚩*

Comments

  1. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    ReplyDelete
  2. जय शिवराय
    जय शंभूराजे

    ReplyDelete

Post a Comment